
रेल्वे प्रवासात महीलांकडील दागिने लुबाडणाऱ्या दोघी अटकेत
कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघा महिलांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघा महिलांकडून पोलिसांनी सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कल्याण रेल्वे स्थानकातून एक्स्प्रेस पकडणाऱ्या फिर्यादी महीले जवळील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात घडलेल्या वेळेचे आणि ठिकाणच्या येथील सीसीटिव्ही फुटेज आणि बातमीदाराच्या मदतीने रेखा शेखर कांबळे (४६) आणि रोजा श्रीनाथ कांबळे (२२) या संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान या दोघींनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले तीन लाख रुपयांचे दागिने आणि इतर गुन्ह्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने असा सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी सदरची कामगिरी श्री कैसर खालीद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई डॉ. संदिप भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पचिम परिमंडळ यांच्या आदेशाप्रमाणे गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेख, सपोनि साठे, पोउनि दिपक शिंदे, सपोउनि कदम यांनी वरील प्रमाणे कारवाई केलेली आहे.