
३७ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पकडण्यात कल्याण तालुका पोलिसांना यश
दिनेश जाधव : कल्याण
३७ वर्षीय आरोपीवर त्याच्यावर गुन्हे देखील ३७ दाखल
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरट्याला कल्याण तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सोहेल शब्बीर दिवाकर, वय ३७ वर्षे, सध्या रा. मिरारोड येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे वय ३७ असून आरोपीवर चोरीचे त्याच्या वया इतकेच ३७ गुन्हे दाखल आहेत. अत्यंत किचकट आणि कोणतेही सबळ पुरावे नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून प्रचंड मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात कल्याण तालुका पोलीस पोलिसांना मोठे यश आले आहे. कल्याण तालुका पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला अटक केल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून तसेच नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी अनेक गुन्ह्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. शब्बीर हा आरोपी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करून त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या आरोपीकडून वाशिंद, भिवंडी परिसरातील चोरी केलेल्या ६ मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असून संबंधित पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून आरोपी अजून किती गुन्ह्यात सहभागी आहे याची माहिती घेण्यात येत आहे.
शब्बीर सोहेल या आरोपीवर एकूण ३७ गुन्हे दाखल असून त्याचा कल्याण तालुका पोलीस स्टेशन व इतर पो.स्टे.कडील नोंदीवरून शब्बीरवर मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची आगाऊ माहिती प्राप्त होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी विजय सुर्वे, पो.ना. दर्शन सावळे, नितीन विशे, पो.शि. योगेश वाघेरे या पथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारच्या माहितीच्या आधारे सखोल तपास करून व अतिशय परिश्रम करून केलेला आहे.