कल्याण रेल्वे यार्डातील धक्कादायक घटना

कल्याण रेल्वे यार्डातील धक्कादायक घटना

दिनेश जाधव : कल्याण

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या मजूरावर धारदार शस्त्रने वार करुन लूटीची प्रयत्न

दोन आरोपी कल्याण जी आर पी च्या ताब्यात तिसरा फरार 

कल्याण रेल्वे यार्डात रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या एका मजूराला बेदम मारहाण करुन लूटीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण जीआरपीने ताब्यात घेत तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे .ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपीमधील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे .

कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात  एक तरुण देवीदास भले हा शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काही काम करीत होता. या दरम्यान तीन तरुण त्याच्या जवळ आले. या तिघांनी देवीदास याची जबरदस्तीने झाडाझडती सुरु केली. या दरम्यान देवीदास याने जोरदार प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार पाहून हे तिघे आणखीन चिडले. तिघांनी देवीदास् याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला जखमी देवीदास याने बचावसाठी आरडाओरडा केला. हे पाहून तिघे पळायला लागले. यातील एका काही नागरीकांनी पकडले. त्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. या बाबत पोलिसांनी  एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याची विचारपूस केली असता त्यांनी इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: