मुलानेच बापाचा केला खून, आईलाही केले जखमी

मुलानेच बापाचा केला खून, आईलाही केले जखमी

दिनेश जाधव : कल्याण

कल्याणच्या चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केली. आड येणाऱ्या आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांच्या वर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बनोरिया यांचा 27 वर्षीय मुलगा लोकेश हा शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद याना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी  व लोकेश ची आई कुसुम वर देखील लोकेशने 8 ते 10 वार केले. तिला देखील जखमी केले. यांनातर स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरात ठेवत पहाटे च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याची माहिती दिली. सोसायटी मधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सर्वजण दिसल्याने याप्रकरणी पोलिसांना बोलवण्यात आले. मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत तसेच आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांना लोकेशवर संशय होता. पोलिसांनी तपास सुरू केला. डॉकटर आणि पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारणा केळ्यांनातर तिने मुलाच्या गुन्ह्याचा पाढा वाचला. दोघा वरही मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी मुलगा लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: