पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या; नेमकं काय घडलं ज्याने कल्याण हादरलं

पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या; नेमकं काय घडलं ज्याने कल्याण हादरलं

दिनेश जाधव : कल्याण

मयत प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवले, असे प्रमोद यांचा मुलगा लोकेशने पोलिसांना सांगितले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे .या सोसायटी रहिवाशांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक घटने बाबत माहिती दिली .घटना कळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले .पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आपल्या पथकासोबत इमारतीच्या चोथ्या मजल्यावर पोहचले असता घरात एक तरुण जखमी अवस्थेत आढळला पोलिसानी घरात जाऊन पाहिले असता एक महिला जखमी अवस्थेत आहे तर एक इसमाचा मृतदेह पडलेला आढळला. घरात सर्वत्र रक्त पसरले होते .ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे .लोकेश याने वडिलांनी आम्हाला जखमी केलं त्यांनंतर स्वतःला संपवुन टाकलं अस पोलिसांना सांगितल आहे दरम्यान लोकेश ने वॉचमन ला एम्ब्युलन्स पाहिजे म्हणून फोन केला मात्र वॉचमनला संशय आल्याने त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना सांगितलं. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता त्यांना धक्का बसला त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटना स्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .मात्र तपासाअंती या प्रकरणातील तथ्य व काय घटना घडली हे समोर येणार आहे . या प्रकरणाच्या तपास सुरू आहे जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्यांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितलय.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: