महिला विनयभंग प्रकरण, भाजपचा फरार नगरसेवकाला अटक

महिला विनयभंग प्रकरण

भाजपचा फरार नगरसेवकाला अटक

कल्याण न्यायालयाने सुनावले तीन दिवसांची पोलीस कोठडी

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनायभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी व सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करत एका पीडित तरुणीने केडीएमसीचे  भाजपचे माजी स्थायी समिती सभापती  संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. काल रात्री संदीप गायकर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला त्याला बाजरपेठ पोलिसांनी अटक केली. संदीप दोन महिन्यांपासून फरार होता. संदीपचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आज पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात संदीपला हजर करण्यात आलं. न्यायालयाने संदीपला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप च्या अटकेने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: