कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला खुन्याच्या गुन्ह्यात अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला खुन्याच्या गुन्ह्यात अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश जाधव : मुंबई

भांडुपमधील सूरज मेहरा उर्फ सूरज नेपाळी याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अमित भोगलेवर याआधी 3 खुनाचे गुन्हे आहेत तर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. तडीपार असलेल्या भोगले याच्यावर मोक्का, एमपीडीएसारखे गुन्हे दाखल आहेत.

कारागृहातून बाहेर पडल्यावर
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सूरज नेपाळी याचा अमित भोगलेसोबत वाद झाला होता. याच रागातून भोगले याने सूरजची ३ ऑक्टोबर रोजी हत्या घडवून आणल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आधी 8 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. या गुन्ह्यात भोगलेचा सहभाग स्पष्ट होताच गुन्हे शाखेने भोगलेला बेड्या ठोकल्या.
अमित भोगलेच्या अटकेनंतर त्याच्याकडून एक स्टेनलेस स्टीलचे ब्लेड, एक तलवार, स्टीलचा एक स्ट्रेस पीस, दोन देशी पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे, एक सफेद रंगांची ग्लोस्टर गाडी आणि दोन मोबाईल असा ४३ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: