नंदुरबार शहरात दिवसा ढवळ्या घरफोड्या करुन पोलीसांना आव्हान देणाऱया आंतरराज्य टोळी जेरबंद, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पोलीसांनी लावला छडा

नंदुरबार शहरात दिवसा ढवळ्या घरफोड्या करुन पोलीसांना आव्हान देणाऱया आंतरराज्य टोळी जेरबंद, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पोलीसांनी लावला छडा

प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)

नंदुरबार :- दिवाळी काळात थेट दिवसा ढवळ्या घरफोड्या करुन पोलीसांना आव्हान देणाऱया आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. या टोळीकडुन चार गुन्हांची उकल करण्यात आली असुन त्यांच्याकडुन चोरीतला 13 लाख 77 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तब्बल 15 हुन अधिक कर्मचाऱयांनी जवळपास दोन आठवडे मध्यप्रदेश आणि पुणे येथे तळ ठोकत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर याआधी घरफोडीचे 63 गुन्हे व एक खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे. या आरोपींचा पाठलाग करतांना जी गाडी सोडुन त्यांनी पोबारा केला होता. त्यात त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले होते आणि त्यावरुनच पोलीसांनी हा सर्व छडा देखील लावला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणने पोलीसांसमोर आवाहन बनले होते. यावरुन पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत गांभीर्याने चर्चा करुन दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालुन आरोपी अटक करुन त्यांचेवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत सक्त निर्देश दिले. तसेच गुन्हे कशा प्रकारे उघडकीस आणावेत याबाबत मार्गदर्शन व सुचना दिलेल्या होत्या, त्यातच दिनांक 10/11/2021 रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा 10.00 ते 13.30 वा. दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलुप तोडुन 10 हजार रुपये रोख व 2 लाख 30 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली तेथील घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचे देखील घराचे कुलुप तोडुन 20 हजार रुपये रोख व 6 लाख 52 हजार 300 रुपये किमंतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे MH-18 पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी भरधाव वेगाने आपले वाहन धुळे रोडकडे वळविले. चारचाकी वाहनाचा पाठलाग करीत असतांना संशयीत आरोपीतांनी दोंडाईचा येथुन वाहन सारंगखेडा गावाकडे कळविले व तेथे एका शेतातील झाडाला ठोकले गेल्यामुळे संशयीत आरोपीतांनी त्यांचे चारचाकी वाहन सोडुन पळुन गेले. पळुन गेलेल्या दोन्ही संशयीतांचा आजु-बाजुच्या परिसरात रात्रभर शोध घेवुन ते मिळुन आले नाही.
सदर चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र, कपड्यांची बॅग, दवाखाण्याचे कागदपत्र व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे टॅमी हत्यार व इतर साहित्य मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरची घटना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळविली.

वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करुन दिनांक 11/11/2021 रोजी एक पथक मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ, इंदौर, सिहोर जिल्ह्यात तर एक पथक पुणे येथे संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी रवाना केले. तसेच नंदुरबार जिल्ह्याला लागुन असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडीचे दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ, इंदौर, सिहोर, रायसेन, ओबेदुल्लागंज मध्य प्रदेश राज्यात सलग 8 दिवस राहुन संशयीत दोन्ही आरोपीतांचा ठाव-ठिकाणा शोधला, परंतु दोन्ही आरोपी गुन्हा करून मध्य प्रदेश राज्यात आले नाहीत तसेच दोन्ही संशयीत आरोपीतांचे नातेवाईक, इतर साथीदार यांची माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता त्यांनी देखील काही एक उपयुक्त माहिती दिली नाही.
पुणे येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीत आरोपीताच्या पत्नीची माहिती काढून सलग 8 दिवस तिच्या घराच्या आजु-बाजुस वेशांतर करुन बातमीदारांचे जाळे निर्माण केले. पुणे सारख्या नविन शहरात देखील अवघ्या आठच दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीदार तयार करण्यात यश आले होते. तसेच पथक संशयीताच्या पत्नीच्या घराच्या आजु-बाजुस रात्रंदिवस वेशांतर करुन पाळत ठेवुन संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेत होते, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांचे टोपन नाव होते त्याचा फोटो किंवा मोबाईल नंबर नव्हते त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीताची पत्नी व तिचा एक मित्र अशांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलीसी खाक्या दाखवून त्यांना बोलते केले. तरी देखील त्यांनी काही एक उपयुक्त माहिती दिली नाही.
दिनांक 22/11/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे येथील बातमीदामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी गोपाळपट्टी, मांजरी याठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. बातमीप्रमाणे मुख्य संशयीत आरोपी त्याठिकाणी सायंकाळी आला, त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालाक असा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्ष्यात येताच त्याने त्याठिकाणाहुन पळ काढला, सापळा लावून बसलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे 1 किलो मिटर पाठलाग त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेवून त्यांचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा वय-40 रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश असे सांगितले. त्यास नंदुरबार येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले. त्याच्या दुसऱ्या साथीदाराबाबत विचारपुस केली असता सद्या तो शिक्रापुर जि. पुणे येथे भाडे तत्वावर घर घेवून राहत असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी शैलेंद्र विश्वकर्मा यास सोबत घेवून शिक्रापूर जि. पुणे येथे जावून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता एका छोट्याश्या घरामधून दुसऱ्या संशयीतास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी) वय-40 रा. राजीव गांधी नगर, सेक्ट-A, EWS, घर नंबर-224 अयोध्या रोड, पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना वेगवेगळे बसवून विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार येथे चोरी केलेला मुद्देमाल दोघांनी मिळुन वाटून घेतला असुन तो त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीतांना सोबत घेवून त्यांच्या घरातुन नंदुरबार येथून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने हस्तगत केले आहे.

ताब्यात घेण्यात आलेला शैलेंद्र विश्वकर्मा यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने नंदुरबार येथे चोरी करण्यापुर्वी संतोषसिंग सोबत संगमनेर जि. अहमदनगर, धुळे शहरात घरफोडीचा प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही. तसेच यापूर्वी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे घरफोडीचे गुन्हे त्याचे भोपाळ, सिहोर मध्य प्रदेश येथील साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. त्याबाबत रेकॉर्ड तपासले असता शैलेंद्र विश्वकर्मा विरुध्द् घरफोडीचे एकुण 63 गुन्हे दाखल त्यात त्यास अटक देखील झालेली आहे. तसेच संतोषसिंग याचेवर खूनाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्याने 14 वर्ष 3 महिने भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कारावासाची शिक्षा भोगलेली आहे.

ताब्यात घेण्यात आलेला संतोष विश्वकर्मा यास विचापुसस केली असता त्याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली. गुगल मॅपद्वारे शहराचा शोध घेवून त्याठिकाणी जावून नव्याने तयार झालेल्या वसाहती शोधून एकांत ठिकाणी बंद असलेले एकसोबत 4 ते 5 घराचे कुलुप तोडुन चोरी करायचे व तेथून पळ काढायचा.
दिवसा घरफोडीचे गुन्हे करुन धुमाकुळ घालणारी आंतर राज्यीय टोळीतील आरोपी नामे 1) शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा वय-40 रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश 2) संतोषसिंग सौदागरसिंग (मोने पंजाबी) वय-40 रा. राजीव गांधी नगर, सेक्ट-A, EWS, घर नंबर-224 अयोध्या रोड, पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश यांना ताब्यात घेवुन नंदुरबार येथील 04 व इतर जिल्ह्यात देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या ताब्यातुन 10 लाख 10 हजार रुपये किमंतीचे 21 तोळे सोनचेे दागिने, चांदीचे दागिने, 15 हजार रुपये रोख, 2 हजार रुपये किमंतीचे मोबाईल व 3 लाख 50 हजार रुपये किमंतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण 13 लाख 77 हजार 335 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे अधिक विचारपूस करुन त्यांच्याकडुनही आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे असे यावेळी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील यांनी सागितले.

पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करुन तपास पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच नंदुरबार शहरातील नागरीकांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या संपुर्ण पथकाचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील,अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश वसावे, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत व संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: