लक्कडकोट येथे चारित्र्याचा संशय घेवून पतीने केला पत्नीचा खुन, म्हसावद पोलिसांनी आरोपीला केले अटक

लक्कडकोट येथे चारित्र्याचा संशय घेवून पतीने केला पत्नीचा खुन, म्हसावद पोलिसांनी आरोपीला केले अटक

प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)

नंदुरबार :- चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीचा खुन केल्याची घटना घडली आहे शहादा तालुक्यातील लक्कडकोट या ठिकाणी ही घटना घडली असून संशयीत आरोपीस याला अटक करण्यात आली आहे

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेवून पतीने आपल्या पत्नीचा कपाशीच्या शेतात निघृण खुन केल्याची घटना घडली असून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कापसाच्या शेतात पुरून दिले.याबाबत आरोपीस अटक करण्यात आली असून म्हसावद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी संध्याकाळी लक्कडकोट येथील रविंद्र ठोबा पावरा(43) हा त्याची पत्नी मंगीबाई रविंद्र पावरा(40) हिला लक्कडकोट ते तलावडी रस्त्यावर चिरडे शिवारातील चिंध्या तुंबड्या पावरा यांच्या कापसाच्या शेतात घेवून गेला. तिथे त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून मारहाण केली.तिचा हाताच्या बोटाने गळा दाबून, बुक्क्यांनी मारहाण करीत ,अणूकूचीदार दगडाने डोक्यावर, कपाळावर,डाव्या डोळ्यावर गंभीर जखमा करून जीवे ठार मारले. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह त्याच कपाशीच्या शेतात खड्डा करून पुरून दिले. याबाबत लक्कडकोटचे पोलीस पाटील सखाराम शंकर पावरा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे म्हसावद पोलीसात भादवी कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मंगीबाई पावरा हीस चार मुली,एक मुलगा असून या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रीयेसह हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.आरोपीला म्हसावद पोलीसांनी रात्री अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: