विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे ३८ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे ३८ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

प्रतिनिधी – उमेश पांढारकर ( नंदुरबार )

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कोराई शिवार येथे हॉटेल महादेव जवळून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे ३८ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सुमारे साडेसव्वीस लाखांचा मद्यसाठा आहे याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कोराई शिवारातून एका कंटेनरमधून विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. पथकाने सदर परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनूसार, कंटेनर वाहन (क्र.डी.डी.०१ ए ९५१९) आले असता सदरचे वाहन पथकाने थांबविले असता चालकास वाहनातील मुद्देमालबाबत विचारपूस केली असता त्याने औषधे असल्याचे सांगितले. मात्र पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर वाहनात विदेशी मद्य असल्याचे आढळले यामुळे सदरचे कंटेनर व चालकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन रात्री १० वाजेच्या सुमारास सदरचे वाहन कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. सील तोडून पाहिले असता सुरुवातीला औषधे आणि त्यानंतर विदेशी मद्यसाठा आढळून आला. वाहनात विदेशी मद्याचे व बियरचे एकूण ३१५ बॉक्स ट्रकमध्ये आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याची (गोवा राज्यात निर्र्मित व विक्रीसाठी) किंमत सुमारे २६ लाख ३८ हजार २०० रुपये इतकी असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच कंटेनर असा एकूण ३८ लाख ४८ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादनच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित रामस्वरुप बिष्णोई यास अटक करण्यात आली आसून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, ९०, ९८ (२), १०३, १०८ व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादनचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती वर्मा व विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादनचे नंदुरबार जिल्हा अधिक्षक युवराज राठोड स्वत: करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: