वैंदाणे येथील खुनाचा गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश, स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलिसांनी घेतले 3 आरोपी ताब्यात

वैंदाणे येथील खुनाचा गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश, स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलिसांनी घेतले 3 आरोपी ताब्यात

प्रतिनिधी – उमेश पांढारकर ( नंदुरबार )

नंदुरबार :- खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यास नंदुरबार पोलिसांना यश आले असून पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे याबाबत आज नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

याबाबत आज पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 14/11/2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे ते खोक्रोळे रस्त्या दरम्यान मोयाणे गावाच्या शेत शिवारात एका विहरीत एक अनोळखी मनुष्याचे प्रेत तरंगत असलेल्या अवस्थेत नागरीकांना दिसुन आल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन विहरीतुन बाहेर काढलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता एका चादरमध्ये गुंडाळलेले व त्याच चादरीने मानेजवळ व पायाजवळ गाठ मारलेली होती तो अनोळखी इसम नग्नावस्थेत होता व मयताच्या डोक्यावर डाव्या बाजुस, पाठीवर व तोंडावर जखमेच्या खूणा दिसत होत्या. सदर मयत इसमाच्या उजव्या हातावर संजय राजेंद्र मोरे असे त्रिशुल मध्ये गोंधलेले असल्याने त्याची ओळख पटवुन सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याने सदर बाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सदा सामुद्रे यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् खूनाचा व पुरावा नष्ट केल्याबाबत गून्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गून्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.

घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. त्यामुळे मयताची ओळख पटवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदारांचे मिळुन वेगवेगळे 8 पथके तयार करुन पथक तपासासाठी रवाना करण्यात आले. मयताची ओळख पटविण्यात जरी पथकांना यश आले होते, परंतु सदर मयत इसमाचे मारेकरी कोण ? त्यास का मारण्यात आले? मारण्याचा उद्देश काय? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते.

गुन्हा घडुन काही दिवस झाले होते तरी पोलीस पथकांना आरोपी पकडण्यात यश येत नव्हते. दिनांक 18/11/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचेा पथक घटनास्थळाच्या परीसरात फिरत असतांना गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, घटनास्थळापासुन काही अंतरावर असलेल्या एका शेतातील शेत रखवालदाराने 7 ते 8 दिवसापुर्वी त्याच्या शेतापासुन काही अंतरावर त्यास रात्रीच्या वेळी 4 ते 5 लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता परंतु निश्चीत कोण अनोळखी इसम कोण आहे ? त्याबाबत काही एक सांगता येत नव्हते.त्या दृष्टीकोणतुन देखील प्रयत्न करण्यात आले पण उपयोगी अशी काहीच माहिती मिळुन येत नव्हती.

दिनांक 19/11/2021 रोजी पुन्हा गोपनीय बातमीदारांकडुन बातमी मिळाली की, मयताचे शनिमांडळ गावातील काही इसमांशी भांडण झाले होते व त्या वादातुनच त्याचा खुन झाला असावा अशी त्रोटक माहिती मिळाल्याने शनिमांडळ गावातील काही संशयीत इसमांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले, परंतु पोलीस तपास कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडै पुन्हा विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दिनांक 06/11/2021 रोजी मयत संजय राजेंद्र मोरे हा त्यांचे घरी वाईट उद्देशाने आल्याने त्याचा त्यांना राग आला त्यामुळे त्यांनी त्याचा शनिमांडळ व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही त्याच दरम्यान तिन्ही संशयीत आरोपीतांना मयत संजय मोरे हा रनाळा ते घोटाणे दरम्यान असलेल्या कार्ली फाटा येथील हॉटेल कर्मभुमी येथुन जेवण करुन बाहेर निघतांना दिसला त्याचा तिन्ही संशयीत आरोपीतांना पाठलाग करुन त्यास हॉटेल कर्मभुमीच्या पुढे सुमारे 100 ते 200 मिटर अंतरावर अडवुन त्यास त्यांच्याकडे असलेल्या लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करुन बेशुध्द केले त्यानंतर त्यास शनिमांडळ शिवारात इंद्रीहट्टी रस्त्याला असलेल्या तलावाजवळ नेवून त्याचा गळा आवळुन जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कपडे काढुन चादरीमध्ये गुंडाळुन मयत संजय मोरे यास तलावात फेकुन दिले व त्यानंतर तिन्ही संशयीत आरोपी घरी निघुन गेले. परंतु मयत सुनिल मोरे याला ज्या तलावात मारुन फेकेले होते तो काही वेळाने नैसर्गिकरीत्या पुन्हा पाण्यावर तरंगु शकतो व आपले बिंग फुटेल या भितीने मयताचे प्रेत आरोपीतांनी दोन ते तिन दिवसांनी पुन्हा पाण्यातुन बाहेर काढुन त्यास वैंदाणे येथील शेत शिवारात असलेले राखीव वनक्षेत्र असलेल्या पुरातन विहीरीत चादरमध्ये गुंडाळुन फेकुन दिल्याचे कबुली दिल्याने 1) संजय रामभाऊ पाटील वय-52 2) शुभम संजय पाटील वय-21 3) रोहित सुखदेव माळी वय-23 तिन्ही रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार यांना अटक केली असुन त्यांना मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच सदर गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील असे यांनी सांगितले.

कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी तसेच संपुर्ण स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: