
बेकायदेशीररित्या वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
नंदुरबार : शहरातील बागवान गल्लीत वीज चोरी चा प्रकार घडला आहे सुमारे २१ हजाराची वीज चोरी केल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील खाटीक बिलाल अहमद अब्दुल सत्तार याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या लाईनवर २५ फुट काळ्या रंगाच्या वायरने आकडा टाकून घराच्या वापरासाठी बेकायदेशीररित्या २१ हजार ६१० रुपये किंमतीची २१० युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विकास सुभाष पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात खाटीक बिलाल अहमद अब्दुल सत्तार याच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. पाडवी करीत आहेत.