पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा

पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा

नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई पदासाठी रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी शहरातील अकरा केंद्रावर 4 हजार 651 उमेदवारांची शंभर गुणाची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल. अशी माहिती ‍जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.

पोलीस शिपाई भरती 2019 करिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ईमेल व मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला असून उमेदवारांनी संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन किंवा https://nashikpolicebharti.in या संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र अनिवार्य असून ते नसल्यास संबंधित उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.उमेदवारांनी परिक्षेस येतांना मोबाईल, बटन कॅमेरे, छुपे कॅमेरा किंवा कोणताही डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक उपकरण परिक्षा हॉलमध्ये आणता येणार नाही. अशा प्रकारची उपकरणे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: