
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे,दि.४- गुन्हे शाखा युनिट 1 यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस नाईक अमोल पवार यांना खडक पोलिस ठाण्यात गर्दी मारामारी च्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी मीनाताई ठाकरे वसाहतींमध्ये उभा असल्याची खबर मिळाली . त्यानूसार विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मारामारीच्या गुन्हयात सहभागी असल्याची कबुली दिली.
त्याला खडक पुढिल कारवाई कामी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या गुन्हयातील तक्रारदार व त्याचा मित्र यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात गाठले. तेथे एका आरोपीने “आत तुझी विकेटच काढतो’ म्हणत शर्टात पाठीमागे लपवलेली तलवार काढून वार केले. फिर्यादीला वाचवण्यासाठी त्याचा मित्र ऋतीक आला असता, त्यालाही आरोपींनी लाथा बुक्कयांनी मारहाण केली होती.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी , पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख यांनी केली आहे.