समर्थ पोलिसांमुळे फरार गुन्हेगार जेरबंद एसटी चालकाच्या डोक्यात फोडली होती बिअरची बॉटल

समर्थ पोलिसांमुळे फरार गुन्हेगार जेरबंद
एसटी चालकाच्या डोक्यात फोडली होती बिअरची बॉटल

पुणे – संचारबंदीत विना मास्क फिरणाºयांवर कारवाई करत असताना समर्थ पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले. त्यापैकी एक जण एसटी चालकाच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडल्या प्रकरणी फरार होता. या दोघांना विना मास्क असल्याने ५०० रुपयांचा दंड ठोठावून फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसºया लाटेमुळे राज्यात संचाबंदी लागू आहे. या संकट काळात पुणे शहर पोलीस आयुक्तलायाच्या क्षेत्रातील समर्थ पोलीस ठाण्याचे पथक विशेष मोहीम राबवून केईएम रुग्णालयासमोरील उंटाडे मारुती येथे कर्तव्यासाठी तैनात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन इसम आले. त्या दोघांनीही मास्त लावले नव्हते. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. मास्क न लावल्याबद्दल जाब विचारला. ‘हडपसर पोलिसांनी गाडी जप्त केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गाडी आणण्यासाठी जात आहे. उशीर झाला. गडबडीत निघालो’ असे उत्तर त्या दोघांनी दिले. त्यावेळी पोलीस पथकातील पोलीस अंमलदार निलेश साबळे व सुमित खट्टे यांना दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आल्या. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपापली नावे प्रेम दशरथ कानडे (२५) व प्रफुल्ल संजय वाघमारे (२२) अशी सांगितली. त्यांची नावे ऐकताच प्रफुल्ल वाघमारे याच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच चौकशीदरम्यान एसटी चालकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले होते. या प्रकरणी प्रेम कानडे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ३५/२०२१) भादंवि कलम ३५३, ३३३, ३३२, ३२३, ३४ नुसार दाखल असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार प्रेम कानडे याला बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर कारवाई परिमंडळ १ चे उपायुक्त प्रियंका नारनवरे, फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, हवालदार रणजित उबाळे, पोलीस नाईक प्रमोद जगताप, महिला पोलीस नाईक स्मिता सिताप, लक्ष्मी चौधरी, पोलीस अंमलदार निलेश साबळे, पोलीस अंमलदार सुमीत खुट्टे, महिला अंमलदार प्रियंका खराडे आदी पोलीस पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: