
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे:- पुण्यातील कोंढव्यात भाई बोलला नाही म्हणून एका तरुणावर जीव घेण्याचा प्रकार कोंढव्यात घडला आहे. फरहान अख्तर पिरजादे वय -१९, रा. कोंढवा-खुर्द, गगन एमरल्ड सोसायटी पुणे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फरहान हा त्याच्या मित्रासह एकत्र येवुन फुटबॉल खेळणेसाठी जात असताना काही दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने फरहानवर पालघन, कोयत्याने सपासप वार करुन जबर जखमी केले.
फरहानवर उपचार करीत जखमांवर तब्बल ११५ टाके घालून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविले आहे.कोंढवा पोलिसांनी क्लॉईड, हर्षे, भूषण व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर खुनाचा प्रयत्र केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोंढव्यातील भाईगिरी काही कमी होण्याची नावच घेत नाही. पोलीस आयुक्तांनी गल्लीतल्या भाईंना आवरने अंत्यंत गरजेचे आहे. मोठे भाई शांत झाले असताना आता छोट्या भाईंना उत आला असून त्यांचे मुसक्या आवळणे महत्वाचे आहे.