
पोलीस महानगर : परवेज शेख
पुणे : औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख २५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली.
याबाबत संजय कापडिया (वय ३७, रा. कोंढवा) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कापडिया यांचे कोंढव्यातील सर्वोदय सोसायटीत शीतल मेडीकल औषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटला. गल्ल्यातील एक लाख २५ हजारांची रोकड लांबवून चोरटे पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.