पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्ड कडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व १ तलवार जप्त

पोलीस महानगर  : परवेज शेख

पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्ड कडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे व १ तलवार जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामगिरी

आज रोजी मा.पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशाने फरारी पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना LCB टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीनुसार, यवत पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पाटस ता.दौंड जि.पुणे येथे बुलेट मोटरसायकलवर संशयास्पदरित्या मिळून आलेला इसम नामे धनाजी मारुती माकर वय ४४ वर्षे रा.पडवी, गायकवाड वस्ती, ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव कमरेला बाळगलेले १ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ बुलेट मोटरसायकल व मोबाइल असा एकुण किं.रु. १,७०,४००/- (एक लाख सत्तर हजार चारशे) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ प्रमाणे कारवाई करणेसाठी जप्त मुद्देमाल व आरोपी वैद्यकिय तपासणी करून यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,  पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, चा.पोहवा. मुकुंद कदम यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: