
१ देशी पिस्टल व ३
जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईतास अटकेत
पुणे : परवेज शेख
१५ ऑक् : बेकायदेशीररीत्या १ देशी पिस्टल व ३
जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या सराईतास युनिट-३ च्या पोलिसांनी
अटक केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, खानवस्ती रामनगर, वारजे या भागात सापळा रचून पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार प्रवीण शिरसाट (वय ३०. रा.
पिंपरी) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील ४०,६००/-
रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस
स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे त्याने किती
पिस्टल व काडतुसे खरेदी केली आहेत, ती कोणाला विकली आहेत, ते
पिस्टल, काडतूस कशाकरिता आणली होती व त्याचे कोण साथीदार आहेत
याचा तपास चालू आहे.
सदरची कामगिरी गुन्हेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त
बच्चनसिंग, गुन्हे प्रतिबंधकचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,
सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस स्टाफ दत्तात्रय गरूड,
राहुल घाडगे, मच्छिंद्र वाळके, शिपाई कैलास साळुके, नितीन रावळ,
कैलास बनसोडे यांनी केली आहे. पुढील तपास भालचंद्र ढवळे करीत
आहेत.