सव्वा दोन लाखांचा नऊशे ग्रॅमचा अफीम जप्त युनिट ३ कडून

सव्वा दोन लाखांचा नऊशे ग्रॅमचा अफीम जप्त युनिट ३ कडून

पुणे : परवेज शेख

गुन्हे शाखा युनिट ३ कडून सव्वा दोन लाखांचा नऊशे ग्रॅमचा अफीम जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा २०१९च्या निवडणुकांच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम् व सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पोलिस अभिलेखावरील टोळीतील गुंड, फरारी, पाहिजे व तडीपार आरोपी यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व पथक सदर आरोपींचा शोध घेत असताना पाहिजे असलेले आरोपी आंबेडकर नगर मार्केटयार्ड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुळ भुसार विभागाचे गेट नं. 3 जवळ मार्केटयार्ड येथे इसम नामे राकेश बंजारा (वय 24, रा. कोंढवा, मुळ रहाणार बडीकल्ला, ता. मिलाडा, जि. जोधपुर, राजस्थान) संशयितरित्या मिळूनआलेने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ नऊशे ग्रॅम वजनाचे 2,25,000/- वजनाचे अफीम मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. तो माल त्याने कोठून आणला, कोणास देणार होता, त्याचे इतर साथीदार कोण आहेत, त्यांची आंतरराज्य टोळी आहे का याबाबत पोलिस तपास करत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय नं. ८ यांच्या न्यायालयात त्याना हजर केले असता 11/10/2019 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी ठेवण्याचेे आदेश दिलेले आहे

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, फौजदार संजय गायकवाड, सहाय्यक फौजदार राहुल घाडगे, दत्तात्रय गरूड, कर्मचारी संतोष क्षिरसागर, मच्छिंद्र वाळके, अतुल साठे, गजानन गानबोटे, चालक सुजित पवार यांनी केली आहे. फौजदार संजय गायकवाड पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: