दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : परवेज शेख

घरात कोणी नसताना पुणे शहर व पुणे ग्रामीण धपरिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करून कोंढवा पोलिसांनी २८ लाख ८० हजाराचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतील सी. वॉच प्रकल्पाअंतर्गत पुणे अंतर्गत सीसीटीव्ही फुटेजवरून दिवसाढवळ्या घरफोडी करत असताना एक गुन्हेगार एकाच ठिकाणी येत असल्याचे दिसले. तसेच एकाच रूटवरून निघून जात असल्याचे दिसले. तारिख ६ सप्टेंबर २०१९ रोजी भाग्योदरनगर, गल्ली नं. १५, कोंढवा येथे गुन्हा घडला असता वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंढवा पोलिस ठाणे तपास पथकातील अंमलदार सुशिल धिवार, पृथ्वराज पांडुळे, पोलिस शिपाई किरण मोरे, किशोर वळे यांनी सदर इसम सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील असल्याचे लक्षातआले. त्याच्या अंगावर तोच ड्रेस असून तो काही अंतर चालत गेल्यावर मोटरसायकलवरून गेला असल्याचे दिसले. सदर इसम कोंढवा-साळुंकेविहार मार्गे हडपसर-सोलापूर रोडने लोणीकंद-केसकंद रोडने गेला असल्याचे महत्वाच्या आस्थापनांसमोरील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यातून दिसून येत होते. सदर आरोपीने ४० कि.मी. इतका प्रवास केला असल्याने ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अडथळे येत होते. सदर आरोपी फक्त दिवसा गुन्हे करत असल्याचे नजरेस आले होते. सी.सी.टी.व्ही. फुटेज जवळ असल्याने सदर आरोपीचे वर्णन येरवडा तुरूंगातून्न सुटलेल्या गुन्हेगारांशी मिळतेजुळते होते. कोर्टकेस येथून माहिती मिळवली असता तो देहुरोड येथे रहाण्यासअसून त्याचे नाव निलेश अंकुश काळे असल्याचे आढळले. तेथे माहिती घेतली असता सदर आरोपी भिमाकोरेगाव ता. हवेली येथ रहात असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता सर्व गुन्हे त्यानेच केल्याचे कबूल केले. सदर आरोपीस २६ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली.

आरोपीचा तांत्रिक तपास व सखोल अभ्यास केल्यावर त्याने कोंढवा, पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात एकूण २० गुन्हे केल्याचे आढळून आले. आरोपीने घटनास्थळं दाखवली असून सदर त्याने चाकण येथील समर्थ ज्वेलर्सचा मालक प्रशांत बागेड याला सदर दागिने विकल्याचे आढळले असून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३, सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २, सिंहगड रोड हद्दीत १, हवेली पोलिस ठाणे हद्दीत १, हवेली पोलिस ठाणे हद्दीत १, हडपसर पोलिस ठाणे हद्दीत १, खेड पोलिस ठाणे हद्दीत १ असे एकूण २० दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून १० लाख रोख व १८,८०,०००/- रूपयाचे दागिने असा एकूण २८,८०,०००/-रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी वॉचमन नाही असे पाहून सोसायट्यांमधला दरवाजा कटावणींच्या सहाय्याने उचकटून दिवसा सकाळी १० ते २ या मुलांना शाळेत सोडायच्या व नमाजाच्या वेळेत गुन्हा करत होता.

सदर कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागचे अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे सहायक पोलिस आयुक्त सुहास बावचे, वानवडी विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, गुन्हेचे पोलिस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, पोलिस नाईक सुशिल धिवार, पृथ्वीराज पांडुळे, निलेश वनवे, उमाकांत स्वामी, योगेश कुंभार, संजीव कळंबे, शिपाई किरण मोरे, किशोर वळे, जोतिबा पवार, अजिम शेख, उमेश शेलार, आदर्श चव्हाण, अमित साळुंके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: