मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगार अटकेत

मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगार अटकेत

पुणे : परवेज शेख

मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुबराव लाड, हवालदार शंकर सोनावणे, शिपाई अशोक शिरकांडे, सागर रासकर, जगदिश ठाकरे, विजय जगताप, अभिजित पालके असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर  पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीएमपीएमएल बस स्टँड, एस.टी. स्टँड येथे पिक पॉकेटिंग मोबाईल चोरीचे प्रतिबंधात्मक करता पेट्रोलिंग करताना सुबराव लाड याना बातमी मिळाली की एस.टी.स्टँडचे आत आवारात नवनाथरसवंती गृहाच्या मागे स्काय ब्ल्यू रंगाचा फूल शर्ट व काळी फूल पँट घातलेला व पाठीवर काळी सॅक घेतलेला एक इसम थांबलेला असून त्याच्याकडे चोरीचे मोबाईल असून तो मध्यप्रदेशात जाण्याच्या तयारीत आहे. अशी बातमी मिळाल्यावर वरील स्टाफसह जाऊन सदर इसमाला शिताफीने पकडून त्याचे नाव, पत्ता विचारले असता शिव प्रसाद रॉय (वय ४०, रा. जिजनौडी, जिल्हा कटनी, राज्य मध्यप्रदेश) येथला असून सध्या पुणे फिरस्ता असल्याचे सांगितले. त्याच्या पाठीवरील  बॅगची पहाणी केली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल १,४९,०००/- रूपयांचे मिळून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं सुरू केली. त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला असता त्याने सांगितले की, सुमारे एक महिन्यापासून शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना या भागांमध्ये बसमध्ये प्रवासी चढत  असताना त्याने त्यांच्या नकळत त्यांच्या खिशातून त्याने मोबाईल चोरले आहेत. त्याच्याकडून आणखी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुबराव लाड पुढील तपास करत आहेत.

सदर कामगिरी पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ १ च्या उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त यादव, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे फौजदार सुबराव लाड, हवालदार प्रविण राजपुत, बशिर सय्यद, शंकर सोनावणे, अशोक शिरकांडे, विजय जगताप, सागर रासकर, जगदिश ठाकरे, अभिजित पालके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: