
गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार अटक
पुणे : परवेज शेख
विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील सो यांच्या आदेशान्वये व स्थानिक गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दहशतवादी विरोधी पथकाचे पोहवा मिरगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक इसम नामे अतुल सहदेवराव केवट वय ३८वषे रा. अकोला यास मळवली रेल्वे स्टेशन लोणावळा ग्रामीण हद्दीतून लोणावळा ग्रामीण पोलिसांचे मदतीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस बाळगून असल्याचे आढळून आले. पुढील कारवाईसाठी सदर इसमास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही श्री संदीप पाटील पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री विवेक पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री नवनीत राणा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा, श्री.पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,श्री संदिप घोरपडे पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार सुनील ढगारे,राजेंद्र मिरघे, ईश्वर जाधव, विशाल भोरडे, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत या पथकाने व लोणावळा ग्रामीण जितेंद्र दिक्षित व अमित ठोसर या पोलीस स्टाफ यांनी केली.