
पिस्टल बाळगणाऱ्या अटकेत
पुणे-परवेज शेख
पुणे:- दि. २६ सप्टेंबर मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेटे, सहाय्यक फौजदार प्रदिप गुरव, हवालदार दत्तात्रय तेलंगे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर गिरमकर, शिपाई शिरीष गोसावी गणेश खरात हे वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना प्रदीप गुरव, ज्ञानेश्वर गिरमकर व शिरीष गोसावी याना जगताप चौकाकडे दोन संशयित इसम मोटर सायकलवरून जोरात जात असल्याची माहिती मिळाली.त्यावरून त्याना अडवले असता ते पळून जाऊ लागले. सिक्रेट सिटी हार्ट, टाऊन सोसायटीजवळ दोघांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळील मोटरसायकलची चौकशी केली असता सदर पल्सर २२० ४५ हजार रूपये नंबर एमएच १४ सीटी २७६७ चोरीची असल्याचे सांगितले. त्याचा साथीदार तडवीकडे एक गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस किंमत २५,२००/- असा एकूण ७०,२०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.