सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे घरफोडी करणारा गुन्हेगार अटक

सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे घरफोडी करणारा गुन्हेगार अटक

पुणे : परवेज शेख

दि.१०/०९/२०१९ रोजी फिर्यादी व त्यांचे पती हे दोघेही नोकरी करीत असल्याने सकाळी नेहमीप्रमाणे
कामानिमीत्त बाहेर गेले होते. संध्याकाळी ०६.१५ वा परत आले असता त्यांचे लक्षात आले की, दरवाजास
लावलेले कुलुप दिसत नाही व दरवाजा उघडा आहे तेव्हा त्यांनी आत जावून पाहणी केली असता घरातील
लोखंडी कपाट उचकटलेले होते व कपाटातील ७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कि रु २,१०,०००/- (दोन
लाख दहा हजार रुपये अंदाजे) चोरीस गेले होते.

मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे व मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्चन सिंग यांनी गुन्हयाच्या ठिकाणी भेट देवन गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार
युनिट ४ कडील पोलीस कर्मचारी अशोक शेलार, सागर घोरपडे, सुरेन्द्र साबळे हे वडगाव शेरी चंदननगर।
परिसरात फिर्यादी यांचे घराच्या परिसरातील खाजगी सी सी टी व्ही ची पाहणी करीत होते. सतत ५ दिवस
६० ते ७० सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यांचे असे निदर्शनास आले की, एका काळया रंगाच्या बलेट मोटार सायकलवरुन निळ्या रंगाचा डिझायनर शर्ट घातलेला इसम हा वडगाव शेरी परिसरात गुन्हा घडला दिवशी संशयितरित्या फिरत होता व त्याच इसमाने गुन्हा केला आहे व त्याचा वावर हा वडगाव शेरी परिसरात असल्याची माहिती समजली. पोलीस कर्मचारी सचिन ढवळे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या।
आधारे सदर गुन्हा करणारा इसम हा गजानन अर्जुन पाटील वय २५ रा गवळी वाडा,वडगाव शेरी,पुणे मूळ रा.
ता जामनेर, जि जळगाव

प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड,सपोनि पवार यांच्या अधिपत्याखाली दोन
टिम तयार करण्यात आल्या. शोध घेतला आरोपी हा गुन्हा केल्यानंतर त्याचे मूळ गावी ता जामनेर येथे
गेल्याचे समजले व तेथून त्याचा शोध घेवून माग काढून त्यास दि. १८/०९/२०१९ रोजी संगमवाडी येथे
गुन्हयात वापरलेली बुलेट क्र एमएच०५/डी सी/४८५९ यासह पकडण्यात आले. त्याचे चौकशीमध्ये त्याने
गुन्हयाची कबुली दिली व चोरीस गेलेला माल हा काढून दिल्याने ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने कि रु २.१०,०००/-
(दोन लाख दहा हजार रुपये अंदाजे) व गुन्हयात वापरलेली बुलेट मोटारसायकल जप्त केली.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, मा पोलीस उप आयुक्त श्री बच्चन सिंह पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक गणेश पवार पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी अशोक शेलार, सागर घोरपडे, जितेन्द्र तुपे, सुरेन्द्र साबळे, सचिन ढवळे, शंकर संपते, शंकर पाटील, शितल शिंदे, अतुल मेंगे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम, राकेश खुनवे, हनुमंत बोराटे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: