कोयता दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक येरवडा पो. स्टेशन

कोयता दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक येरवडा पो.स्टेशन

पुणे : परवेज शेख

_ दिनांक २७/०८/१९ रोजी पहाटे ०३/०० वाजताचे सुमारास फिर्यादी नामे
धीरजकुमार श्रीकांत बिहाणी ,रा.वाघोली हे नाशिक येथुन शिवाजीनगर येथे उतरुन तेथुन त्यांचे दुचाकी वरुन
संगमवाडी रोडने घरी जात असताना ते संगमवाडी येथे लघुशंकेकरीता थांबले असता तेथे काही वेळातच तीन
अनोळखी इसम त्यांचे जवळ आले त्यांचे पोटाला लोखंडी कोयता लावुन फिर्यादी यांचे कडील १ ओपो कंपनीचा
मोबाईल, १०,५००/- रु.रोख रक्कम, फिर्यादी यांचे घडयाळ व गाडीची चावी जबरदस्तीने हिसकावुन चोरुन
नेली. म्हणुन सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाचा तपास पो. उपनिरीक्षक मंगेश भांगे येरवडा पो.स्टे हे करीत असून
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोशि/निकम,पोशि भाकरे यांना गोपनीय बातमीदार यांचेकरवी मिळाले
बातमीवरुन पेट्रोलिंग दरम्यान येरवडा पोलीसांनी इसम नामे १) राकेश जॉनी सकट, वय -१९ , वर्षे, रा.
मंगळवार पेठ,२२६,पुणे. २) हरजिंदर सिंकंदर सिंग बग्गा,वय – २३ वर्षे,लोहगाव पुणे व त्यांचा १ अल्पवयीन
साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील जबरदस्तीने चोरलेले १ ओपो
कंपनीचा मोबाईल, १०,५००/- रु.रोख रक्कम, फिर्यादी यांचे घडयाळ व गाडीची चावी तसेच चोरी
करण्यासाठी वापरलेली एक अॅक्टीव्हा गाडी, व एक लोखंडी कोयता असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा
मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग श्री सुनिल फुलारी,
मा.पोलीस उप आयुक्त सो परि-५ श्री प्रसाद अक्कानवरु, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री रामचंद्र देसाई, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे ) श्री अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश भांगे, पोना/शेख,पोना/मेमाणे, अशोक गवळी सुनिल नागलोत ,पोशि अंकुश निकम,पोशि/भाकरे, यांनी केली करीत आहे।

3 thoughts on “कोयता दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक येरवडा पो. स्टेशन

 1. There is certainly a lot to know about this subject.
  I like all of the points you’ve made. I have
  been surfing online more than 4 hours today, yet I never found any interesting
  article like yours. It is pretty worth enough for me.
  In my opinion, if all webmasters and bloggers made good content as
  you did, the internet will be much more useful than ever before.
  I could not refrain from commenting. Perfectly written! http://car.com

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: