पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात ५० घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात ५० घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

पुणे-परवेज शेख

एक किलो सोन्याच्या दागिन्यांसह ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटय़ांमध्ये बंद सदनिकांची पाहणी करून ५० घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले. चोरटय़ांकडून १ किलो सोन्याचे दागिने, १० किलो चांदीचे साहित्य, ३ लाखांची रोकड, ६ मोटारी, परदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुसे असा ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरटय़ांकडून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफाला अटक करण्यात आली.

गोरखसिंग गागासिंग टाक (वय ३०), उजाला प्रभूसिंग टाक (वय २७), बल्लूसिंग प्रभूसिंग टाक (वय ३०), जलसिंग राजपूत दुधाणी (वय २०,रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडून दागिने विकत घेणारा सराफ सत्यनारायण वर्मा (रा. लोणीकाळभोर) याला अटक करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीचे गुन्हे वाढले होते. सोसायटय़ांमधील बंद सदनिकांची पाहणी करून ऐवज लांबविण्यात आला होता. चोरटय़ांचे सीसीटीव्ही चित्रीकरणात वर्णन मिळाले होते. तेव्हा चोरटे रामटेकडी भागातील सराईत चोरटे असल्याचा संशय होता. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती.
रामटेकडीतील अंधशाळेजवळ बल्लूसिंग टाक, गोरखसिंग टाक, उजाला टाक थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. तेव्हा टाक यांनी पोलिसांबरोबर झटापट केली. त्यांनी पोलिसांवर हल्ला चढविला. एका पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर बल्लूसिंग टाक याने स्वत:वर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. टाक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा साथीदार दुधाणी धुळे परिसरात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला धुळ्यातून ताब्यात घेतले. या टोळीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ५० घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हल्ला परतावून लावणाऱ्या पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस
घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांना पकडण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे पोलीस कर्मचारी महेश कांबळे, नवनाथ खताळ, नासीर देशमुख, सुधीर सोनावणे यांना सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी प्रत्येकी दहा हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले. चोरटय़ांनी बहुंताश घरफोडीचे गुन्हे मध्यरात्री केले. मोटारीतून ते सोसायटीत शिरायचे. बंद सदनिकांची पाहणी करून चोरटय़ांनी घरफोडी केली. एकापाठोपाठ घरफोडीचे गुन्हे करून चोरटे शहराबाहेर पसार व्हायचे. त्यांच्याकडून दागिने विकत घेणारा शर्मा याला अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी,
पोलीस सह आयुक्त पुणे शहर रवींद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त पूर्वप्रादेशिक विभाग पुणे शहर सुनील फुलारी, पोलिस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शना खाली व सूचनेप्रमाणे वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सलीम चाऊस, साहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश भोसले, पोलीस हवलदार राजू रासगे, पोलीस नाईक संभाजी देवीकर,योगेश गायकवाड, धर्मा चौधरी, पोलीस शिपाई नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे, प्रतिक लाहिगुडे, अनुप सांगले, प्रविण उतेकर, महिला पोलीस शिपाई राणी खादवे, वनिता कोलते यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: