
राज्यपालांच्या हस्ते विधानभवन प्रांगणात ध्वजवंदन
पुणे : परवेज शेख
आज देशात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. त्यातच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व अधिकारीदेखील उपस्थित होते त्यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.