सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात ५ व्या आरोपीला राजस्थान मधून जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात ५ व्या आरोपीला राजस्थान मधून जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – अभिनेता सलामन खान याच्या वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात ५ व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला राजस्थानवरून अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. लवकरच गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. रविवार, १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मात्र गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत गुजरातच्या भुज येथून सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन्ही आरोपींना अटक केली. बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.

त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्या चौघांनाही न्यायालयसमोर हजर करण्यात आले असता त्यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यापैकी एक आरोपी अनुज थापन याने गेल्या आठवड्यात जेलमध्ये असतानाच गळफास लावून आयुष्य संपवलं. मात्र एवढ्या घडामोडींनतरही गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अद्याप कायम ठेवला असून आता या गोळीबार प्रकरणातील पाचव्य आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकण्यात आल्याचे समजते. मोहम्मद चौधरी याने सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी आणि सागर यांना पैसे पुरवले आणि सलमानच्या घराची तसेच फार्महाऊसची रेकी करण्यास मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पथक त्या आरोपीला लवकरच मुंबईत येणार असल्याचेही माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon